Announcement

Collapse
No announcement yet.

Naxalisms in marathi

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • Naxalisms in marathi

    नक्षल चळवळीने ३३ पैकी २२ राज्ये, ६०४ पैकी जिल्हे १२ हजार ४७६ पैकी 1 हजार 611 पोलिस ठाणी आणि 6 लाख 50 हजारपैकी 14 हजार गावे घेरली आहेत. भारताच्या 35 टक्के भागावर याचा परिणाम झाला आहे. हा भाग जम्मू-काश्मींर आणि पूर्वोत्तर भागाच्या तुलनेत मोठा आहे. 2011 मध्ये 259 नागरिक, 275 सुरक्षादलाचे कर्मचारी, 253 नक्षलवाद(ज्यांचे मृतदेह सापडले नाहीत?) असे एकूण 887 जण घातपातात मारले गेले. ही जरी आपल्याच देशात रुजलेली, अंकुर फुटलेली व पिकलेली चळवळ असली, तरी त्याला खतपाणी घालण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे काम पाकिस्तानच्या "आयएसआय' आणि इतर भारतविरोधी राष्ट्रांनी केले आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालाने हे दाखवून दिले आहे, की नक्षलवाद्यांनी भारतातील व भारताबाहेरील दहशतवादी गटांशी संपर्क प्रस्थापित केले आहेत. स्वदेशात वाढलेल्या या चळवळींची मुळे ही संपूर्ण देशभरात असून, ती आता नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान व श्रीलंकेत पाय पसरत आहे. नक्षलवादी विदेशातून शस्त्रास्त्रे मिळवत आहेत. हे हिमनगाचे केवळ टोक असल्याचे ठाम विधान केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले आहे. नक्षलवाद्यांचे ज्यांच्याशी संबंध आहेत, त्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल -

    अ) भारतीय दहशतवादी गट, ब) विभागीय दहशतवादी गट क) आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांचे भारतीय दहशतवादी गटांशी असणारे संबंध.
    जम्मू आणि काश्मीगर गट ः जम्मू आणि काश्मी र दहशतवादी गट व नक्षलवादी प्रवक्ते हे जम्मू आणि काश्मीकर येथे होणाऱ्या दहशतवादी कारवाया व परिणामांचे बऱ्याच घटनांमध्ये समर्थन करीत असतात. 2001 मध्ये कलकत्ता येथील अमेरिकी केंद्रावर हल्ला केलेल्या लष्कर-ए-तरशयबाच्या दहशतवाद्याने झारखंड येथून पलायन करून, रांची येथील एका नक्षल समर्थकाच्या घरी आसरा घेतला होता. या बदल्यात विस्फोटक यंत्रे व आधुनिक हत्यारे वापरण्यात पारंगत असलेले जम्मू-काश्मीआर येथील दहशतवादी नक्षलवाद्यांना प्रशिक्षण देतात.

    पूर्वोत्तर विद्रोही गट

    नक्षलवादी व पूर्वोत्तर असणारे विद्रोही गट उदाहरणार्थ "उल्फा", "एनएससीएन' आणि "पीएलए' यांच्यात संबंध असल्याचा अहवाल गुप्तहेर संघटनांनी दिला आहे. "पीएलए' आणि "एनएससीएन' या पूर्वोत्तर विद्रोही गटांनी माओवादी विचारसरणी अवलंबली आणि प्रशिक्षण घेतले. याचे 60 व 70 च्या दशकात चीनने समर्थन केले.

    विभागीय गटांशी असणारे संबंध

    नेपाळ माओवादी संबंध ः नेपाळमधील माओवाद्यांशी नक्षलवाद्यांचे असणारे संबंध हे धोकादायक आहेत. एकूण 400 माओवाद्यांना घेऊन नेपाळ व भारत माओवाद्यांनी संयुक्तपणे 22 जून 2005 रोजी मधुबन व पूर्व चंपारण जिल्ह्यातील पोलिस चौकवीर केलेला हल्ला ही ऐतिहासिक घटना होती. अशा काही घटना व प्रसंग आहेत, ज्यातून सिद्ध झाले आहे, की भारत व नेपाळच्या माओवाद्यांमध्ये सहकार्याचा, समन्वयाचा, गुप्तवार्ता सांगण्याचा आणि साधनांची देवाण-घेवाण करण्याचा करार झाला आहे. वृत्तपत्रांनी किशनजी आणि नेपाळी माओवाद्यांमध्ये बैठक झाल्याची बातमी झाली होती. नेपाळी माओवादी पुन्हा एकदा युद्ध मार्गावर असून परिस्थिती गंभीर होण्याची शक्यझता आहे.

    "एलटीटीई'शी असणारे संबंध

    एलटीटीइला श्रीलंकेने युद्धात पराभूत केले आहे. या युद्धात वाचलेले काही एलटीटीइचे कट्टर सदस्य योग्य किंमत दिल्यास घातपाती कारवाया घडवून आणू शकतात. त्यांच्याकडे लपवून ठेवलेली कित्येत हत्यारे आणि दारुगोळा सुद्धा उपलब्ध आहे. अधिकाधिक पैसे खर्च करण्याची असणारी क्षमता आणि एलटीटीइच्या तज्ज्ञांसाठी किंमत मोजण्याची असणारी तयारी यामुळे नक्षलवाद्यांकडे प्रशिक्षित मानवीबॉंब आणि आधुनिक शस्त्रास्त्रे याआधीही दिसून आली. संयुक्त प्रशिक्षण शिबिरे आणि रेड गुरीलाज यांच्या तमिळ टायगर्सबरोबर दक्षिण व मध्य भारतातील जंगलांमध्ये होणाऱ्या बैठकांचे ताजे पुरावे गुप्तहेर संघटनांना सापडले आहेत. युद्धामध्ये माओवादी आणि तमिळ टायगर्स भाऊ आहेत का? या प्रश्ना्चे उत्तर हो आहे. वास्तविक भारतीय जलक्षेत्रात तमिळ टायगर्स घुसखोरी करीत असल्याच्या सूचना गुप्तहेर संघटनांनी आंध्र प्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यांना दिल्या आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, उच्च प्रशिक्षित 12 जण असलेल्या तमिळ टायगर्सच्या गटाने भारतातील माओवाद्यांशी हात मिळविण्यासाठी नुकतीच घुसखोरी केली आहे. याचा माओवाद्यांना काय फायदा होईल? सुरक्षादलांना अशी श्नयता वाटते, की माओवादी त्यांचा सामरिक आधार आणि छत्तीसगडमधील दंडकारण्यात असणारी त्यांची पकड येथे केंद्रीय दलांच्या होणाऱ्या "ऑपरेशन ग्रीन हंट' या सांकेतिक मोहिमेपासून संरक्षण करण्याची तयारी करण्यासाठी ते तमिळ टायगर्सची मदत घेतील.

    आंतरराष्ट्रीय संबंध

    "आरआयएम'चे (रिव्हॉल्युशनरी इंटरनॅशनल मुव्हमेंट) सदस्य - "आरआयएम' ही संघटना जगातील माओवादी गटांना प्रोत्साहन देते व मदत करते. हा अमेरिकेतील पायाभूत गट असून, जो वैचारिक अभियान चालवितो. एक तुर्की लेफ्ट विंग एक्स्ट्रि मिस्ट ग्रुप हा संकेतस्थळ, सार्वजनिक प्रकाशने आणि साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करते. सीपीआय (भारतीय कम्युनिस्ट पार्टी) (माओवादी) हा "आरआयएम'चा सदस्य आहे आणि या संकेतस्थळावर संपूर्ण जगात प्रस्थापित करण्याची संधी देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्यासाठी त्याला सूचिबद्ध केले आहे.

    लेफ्ट विंग साऊथ इस्ट एशियन ग्रुपसोबत संबंध

    दक्षिणपूर्व आशियामधील प्रसार माध्यमातील काही बातम्यांमध्ये असे म्हटले आहे, की भारतातील नक्षलवाद्यांनी फिलिपीन्सच्या लेफ्ट विंग एक्स्ट्रि मिस्ट बरोबर आणि त्यांच्याद्वारे दक्षिणपूर्व आशियातील इतर गटांबरोबर संबंध वाढविले आहेत. माओवादी - सीमी, लष्कर - ए- तोयबा (एलईटी), हुजी यांच्यात गठबंधन (टायअप) ः बंदी असलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) यांच्याबरोबर माओवाद्यांनी संबंध प्रस्थापित केले असून त्यांचा पाया दक्षिण भारतात बसविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही संस्थांच्या नेत्यांनी ऐक्य निर्माण करण्यासाठी बंगळुरू आणि हैदराबाद येथे दोन बैठका घेतल्या. चर्चेनंतर, दोन्ही संघटनांनी दक्षिण भारतात संयुक्तपणे पाया उभारणी करायचे ठरविले, तोपर्यंत केरळच्या बाहेरून सर्व हालचाली करून संघटनेत भरती करण्याचे ठरविण्यात आले. माओवाद्यांनी नेहमीच काश्*मीर दहशतवादाचे समर्थन केले आणि आणि भारतातील मुसलमानांच्या छळाविरुद्ध ते आवाज उठवितात. सिमीवर बंदी घालण्याआधी सिमीची पाळेमुळे ही केरळमध्ये घट्ट होती आणि तिथेच माओवाद्यांशी संबंध पाहिल्यांदा दिसून आले. माओवाद्यांची संख्या देखील तिथे वाढली. बहुतेक माओवादी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सिमीच्या आधाराने केरळमध्ये आसरा घेतला. गेल्यावर्षी सुमारे 500 माओवाद्यांना सिमीने इडुक्की्कोट्यम सीमेवरील व्हॅगमॉन टेकडीवर प्रशिक्षण दिले. माओवादी कार्यकर्त्यांना कमांडो प्रशिक्षण देण्यात आले आणि काहींना सिमीच्या आत्मघाती गटात प्रशिक्षण देण्यास सांगण्यात आले होते. मध्यप्रदेशात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सिमी नेता सफदार नागोरीने याची खात्री दिली. त्यांना हे माहित आहे की, भारताला अस्थिर करण्याचा त्यांचा उद्देश माओवाद्यांची मदत घेतल्यास सफल होऊ शकतो. कोणत्याही साध्या कारणासाठी भारताला हिंसक पद्धतीने विरोध करण्याची माओवाद्यांची रणनीती महत्त्वपूर्ण आहे. पाकस्थित लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेबरोबर माओवाद्यांनी संबंध प्रस्थापित केले आहेत. प्रश्नद हा आहे की, माओवाद्यांचे इलईटीसोबत कधीपासून संबंध आहेत आणि या अपवित्र नात्यामागाचे कारण काय असू शकते? तसेच हे दोघे एकमेकांना कधीपर्यंत उपयोगी पडू शकतात?

    गेल्या आठ वर्षापासून "एलईटी' पश्चिशम बंगालवर नजर ठेऊन आहे. मुंबई हल्ल्यापूर्वी बांगलादेश स्थित "एलईटी'ची बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरकत-उल-जिहादी लष्कराच्या आठ दहशत मॉड्यूल्सवर नियंत्रण ठेवत होती. जेव्हा येथील सुरक्षितता अधिक वाढविण्यात आली, तेव्हा ते आसामच्या दिशेला गेले. "एलईटी'ला असे वाटते की, माओवादी एका हिंसक लढाईची योजना बनवित होते आणि त्यांना शस्त्रास्त्रे व प्रशिक्षणाची गरज होती. त्यामुळे त्यांच्यासोबत करार करणे सहज श्नय होते. "एलईटी'ने सहकार्याच्या बदल्यात त्यांना दोन्ही गोष्टी देण्याचे मान्य केले. माओवाद्यांनी लष्कराच्या कार्यकर्त्यांना सुरक्षितपणे पश्चि्म बंगालमध्ये प्रवेश करण्यासाठी मदत केली. चिंता ही आहे की, आसाम व पश्चिुम बंगालपुरतेच "एलईटी' मर्यादित नाही. त्यांनी अशाच गटांबरोबर करार करून झारखंड, उत्तरप्रदेश, केरळ, मध्यप्रदेश व महाराष्ट्रात प्रवेश मिळविला आहे. अशा गटांचे देशाबाहेरून समर्थन करणारे असे दहशतवादी गट माओवाद्यांना हत्यारे, दारुगोळा व प्रशिक्षित दहशतवादी पुरवितात आणि त्यांचा वापर सुरक्षादलांच्या विरोधात केला जातो. "एलईटीए'ची समुद्रमार्गे मदत मिळत असल्याने पूर्वेकडील समुद्रतटांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. "एलईटी' व "हुजी'ची मुख्यसूत्रे बांगलादेशातून हालतात. त्यामुळे बांगलादेशाच्या सीमेवरील सीमा सुरक्षा दलाने तेथून होणारी घुसखोरी पूर्णपणे थांबविली पाहिजे. बांगलादेशातून होणाऱ्या "एलईटी', "हुजी' यांच्या सर्व कारवाया बंद पाडण्यासाठी आपल्याला बांगलादेशावर दबाव आणणे गरजेचे आहे. नेपाळमधील माओवाद्यांमुळे नेपाळने चीनला सर्वक्षेत्रात खूप आत प्रवेश करु दिला आहे. त्यामुळे प्रचंड या नेपाळच्या माओवादी नेत्याला ताकीद देणे आवश्याक आहे. भारत नेपाळ सीमा बंद करणे गरजेचे आहे. माओवाद्यांना देशाबाहेरून होणारी मदत थांबविल्यास कारवायांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविता येईल. शेवटी मूळ प्रश्नन असा उभा राहतो, की माओवादी किंवा नक्षलवाद आपल्या देशात रुजलाच कसा? कारण एकच, विविध राज्य शासनाचा गलथान, गलिच्छ भ्रष्ट कारभार व त्याच्या जोडीला तितकीच बेजबाबदार निद्रिस्त निष्काळजी पोलिस यंत्रणा! या अभेद्य मिश्रणांचा देशांचे शत्रू गैरफायदा का घेणार नाहीत?

    आज अबुजमाड दंडकारण्यामध्ये 10,000 च्या आसपास नक्षली आहेत जोपर्यंत मोठी मोहीम काढून त्यांचा खातमा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पोलिस काही करू शकणार नाही. ही लढाई करण्यास 35000 ची सीआरपीएफ, सीमा सुरक्षादलाची फौज पुरेशी नाही. त्यांची संख्या फार जास्त 64000 - 80000 पर्यंत वाढवायला हवी. याशिवाय महाराष्ट्रात नक्षल लढाई केवळ सी 60 नक्षलविरोधी पथकावर सोडली आहे. (4-5000 संख्या) प्रत्येक पोलिस जवान आणि अधिकाऱ्यांना या लढाईत भाग घ्यायला हवे. पुढचे प्रमोशन मिळण्याकरता नक्षल लढाईत भाग घेणे सगळ्यांना अनिवार्य करावे. केवळ गरीब अदिवासी आणि नवख्या पोलिसांवर हे सोडू नये. याशिवाय प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यास नक्षलभागात कमीत कमी एक महिना ठेवावे. सगळे मंत्री सुद्धा पाळी पाळीने या भागात रहावे. नक्षलवादांची लढाई खुप वेळ चालणार आहे. सगळ्यांनी हातभार लावला तरच यात यश मिळू शकेल.
Working...
X